Advertisement

सर्वसामान्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत लोकल ट्रेन बंदच

मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू होण्यासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही.

सर्वसामान्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत लोकल ट्रेन बंदच
SHARES

मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू होण्यासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. त्यामुळे नवीन वर्षीतच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणं योग्य नाही. त्यामुळे  काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. गणपतीनंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली. मात्र दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येवू नये म्हणून खबरदारी बाळगली जात आहे. मुंबई महापालिकेकडून चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. शिवाय परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या देखील करण्यात येत आहेत. 



हेही वाचा -

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा