Advertisement

मुख्यमंत्री निवासस्थानाची पाणीपट्टी थकलेली नाही, महापालिकेचा खुलासा

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी ‘निरंक’ आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानाची पाणीपट्टी थकलेली नाही, महापालिकेचा खुलासा
SHARES

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी ‘निरंक’ आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे.  

पाण्याचं २४ हजार ९१६ रुपयांचं बिल थकवल्याने मुंबई महापालिकेकडून (bmc) चक्क मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला डिफाॅल्टर घोषित करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये झळकलं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासोबतच इतर मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी देखील थकली असून ही रक्कम एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी असल्याचा दावा यात करण्यात आला होता.

हेही वाचा- पाणीबिल थकवणाऱ्यांवर कारवाई करा- देवेंद्र फडणवीस

'माहिती अधिकार' कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळवरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केल्याचा दावा केला होता. त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांसोबतच इतर मंत्र्यांच्या थकीत पाणीपट्टीची रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी दाखवण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) (वर्षा बंगला), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा), अर्थमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राऊत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट),  राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहची नावं नमूद करण्यात आली होती. 

त्याबाबत, महापालिकेने खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल स्थित ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे, असं महापालिकेने केलेल्या खुलाशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

(no water bill pending of maharashtra cm varsha residence says bmc)

हेही वाचा- पाण्याचं 'इतकं' बिल थकवलं, मुख्यमंत्र्यांचा बंगला महापालिकेकडून डिफाॅल्टर घोषित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा