Advertisement

पाणीबिल थकवणाऱ्यांवर कारवाई करा- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासोबतच इतर मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी देखील थकली आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाणीबिल थकवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पाणीबिल थकवणाऱ्यांवर कारवाई करा- देवेंद्र फडणवीस
SHARES

पाणीपट्टी थकवल्याने मुंबई महापालिकेकडून (bmc) चक्क मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला डिफाॅल्टर घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासोबतच इतर मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी देखील थकली आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाणीबिल थकवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही माहिती उघड झाल्याने यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, एखाद्या बंगल्याचं पाण्याचं बिल थकलं असेल, तर त्यात त्या नेत्याची वा मंत्र्यांची चूक नाही. कारण या बंगल्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाते. त्यामुळे पाणीबिल थकवल्याबद्दल पीडब्ल्यूडी विभाग किंवा संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा- पाण्याचं 'इतकं' बिल थकवलं, मुख्यमंत्र्यांचा बंगला महापालिकेकडून डिफाॅल्टर घोषित

'माहिती अधिकार' कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळवरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे. त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांसोबतच इतर मंत्र्यांच्या थकीत पाणीपट्टीची रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) (वर्षा बंगला), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा), अर्थमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राऊत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट),  राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहची नावं आहेत.

शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनते का भरावं ? तसंच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचं पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी सरकारला विचारला आहे.  

(take a strict action for not paying water bill of government bungalow demands devendra fadnavis)

हेही वाचा- बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्चाचा आकडा आला कुठून?- अजित पवार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा