Advertisement

बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्चाचा आकडा आला कुठून?- अजित पवार

मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा फेटाळून लावताना हा आकडा आला कुठून? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्चाचा आकडा आला कुठून?- अजित पवार
SHARES

कोरोनाचं संकट सुरू असताना आणि सरकारी तिजोरीत खडखडाट असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचं आल्याचं वृत्त सध्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा आकडा आला कुठून? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी उपस्थित केला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारमधील काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण ३१ बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या होत्या. परंतु निविदा मंजूर होण्याआधीच बंगल्यांच्या डागडुजीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर या बंगल्यांच्या कामापाेटी ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. त्यावर विरोधक सरकारला लक्ष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, प्रसारमाध्यमांमध्ये जो दावा केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च झालेले नाहीत. या संदर्भात मी स्वत: माहिती घेतली आहे. तरीही काहीजण माहिती न घेताच चुकीच्या बातम्या देत आहेत. असा कुठलाही आकडा आमच्यापुढं आलेला नाही, मग हा ९० कोटी खर्चाचा आकडा आला कुठून?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. 

हेही वाचा- बंगल्यावर एक रुपयाही खर्च केलेला नाही, धनंजय मुंडेंचा खुलासा

तर धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी देखील आपल्या बंगल्यावरील खर्चाबाबत स्वत: खुलासा केला आहे. 

काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर ३ कोटी रुपये खर्च केल्याचंही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तिथं अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही, असं म्हणणं धनंजय मुंडे यांनी मांडलं आहे.

प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना विचारणा केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्र्यांच्या बंगल्याची कामे वर्षभर सुरूच असतात. त्यामुळे बंगल्यावर किती रुपये खर्च झाले यापेक्षा त्याआधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कवडीचीही मदत न देता केवळ बंगल्यांवर पैसे खर्च करण्यात येत असले, तर ते चुकीचं आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

(deputy cm ajit pawar denied rumours of maharashtra government spend 90 crore rupees on bungalow renovation)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा