Advertisement

बंगल्यावर एक रुपयाही खर्च केलेला नाही, धनंजय मुंडेंचा खुलासा

शासकीय निवासस्थानावर एक रुपयाही खर्च केलेला नाही, असा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बंगल्यावर एक रुपयाही खर्च केलेला नाही, धनंजय मुंडेंचा खुलासा
SHARES

कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. यावर खुलासा करताना शासकीय निवासस्थानावर एक रुपयाही खर्च केलेला नाही, असा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारमधील काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण ३१ बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या होत्या. परंतु निविदा मंजूर होण्याआधीच बंगल्यांच्या डागडुजीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर या बंगल्यांच्या कामापाेटी ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

हेही वाचा- पाण्याचं 'इतकं' बिल थकवलं, मुख्यमंत्र्यांचा बंगला महापालिकेकडून डिफाॅल्टर घोषित

या बंगल्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्याचाही उल्लेख आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी स्वत: खुलासा केला आहे. 

काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर ३ कोटी रुपये खर्च केल्याचंही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तिथं अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही, असं म्हणणं धनंजय मुंडे यांनी मांडलं आहे.

तर याबाबत प्रसारमाध्यमांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना विचारणा केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्र्यांच्या बंगल्याची कामे वर्षभर सुरूच असतात. त्यामुळे बंगल्यावर किती रुपये खर्च झाले यापेक्षा त्याआधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कवडीचीही मदत न देता केवळ बंगल्यांवर पैसे खर्च करण्यात येत असले, तर ते चुकीचं आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. 

याच जोडीला मुख्यमंत्र्यांसोबत इतर मंत्र्यांच्या बंगल्यांनी मुंबई महापालिकेची २४ लाख रुपयांहून अधिक रुपयांची पाणीपट्टी थकवल्याने या सरकारी बंगल्यांना डिफाॅल्टर घोषित करण्यात आला आहे.

(not a single rupees spent on government bungalow claims maharashtra social justice minister dhananjay munde)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा