अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक

कारवाईदरम्यान जप्त केलेल्या ‘एमडी’ ड्रग्जची किंमत ही एक कोटी रुपयांची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक
SHARES

मुंबईत एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेस अमली पदार्थ विभागाच्या वांद्रे युनिटन अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी ११०० ग्रॅम ‘एमडी’ आणि आठ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. सनम सय्यद असे या आरोपीचे नाव आहे. या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या ‘एमडी’ ड्रग्जची किंमत ही एक कोटी रुपयांची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचाः- प्रताप सरनाईक हाजीर हो...! ईडीकडून पुन्हा बोलावणं

वांद्रे परिसरात राहणाऱ्या सनमचा नवरा तारिक सय्यद हा शहरातील मोठा तस्कर आहे. विविध शहरात मागणी नुसार तो पुरवठा करतो. तर सनम ही किरकोळ तस्करांना ड्रग्ज पुरवते. मात्र दोघंही फक्त एमडी ड्रग्जचीच तस्करी करतात. याचे कारण म्हणजे शहरातील तरुणांमध्ये वाढलेलं एमडी  ड्रग्जचं सेवन, सनमच्या तस्करीची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक अनिल वाढवणे यांना मिळाली. खातरजमा करून शुक्रवारी सनमच्या निवासस्थानी छापा घातला. या कारवाईत पथकाच्या हाती ११०० ग्रॅम ‘एमडी’ आणि आठ लाख रुपयांची रोकड लागली.

हेही वाचाः-आजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा

चौकशीदरम्यान तारिक आणि चिंटू पठाण अन्य व्यवसायाआड ‘एमडी’ची तस्करी आणि घाऊक विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी नशेचा खर्च भागवण्यासाठी लोकांकडे हात पसरणारा चिंटू अचानक ‘एमडी’चा वितरक झाला. अलीकडे परिसरात त्याला चिंटूऐवजी पाब्लो एक्स्कोबार (कोलंबियन ड्रग माफिया) या नावे ओळखतात. अटक आरोपी सनमच्या माध्यमातून अमली पदार्थ विरोधी पथक तारिक आणि पठाणचा शोध घेत आहेत. तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे दोघे बेरोजगार आहेत. ‘एमडी’ विक्रीऐवजी अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन दोघांकडे नाही. त्यांची पुणे, कोल्हापूर, गुजरात येथे सतत भटकंती सुरू असते. त्याबाबतही चौकशी सुरू आहे. तारिकच्या अनुपस्थितीत त्याची दुसरी पत्नी सनम अमली पदार्थ विक्रीचे सर्व व्यवहार हाताळत होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा