प्रताप सरनाईक हाजीर हो...! ईडीकडून पुन्हा बोलावणं


प्रताप सरनाईक हाजीर हो...! ईडीकडून पुन्हा बोलावणं
SHARES

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने पुन्हा एकदा सरनाईक यांना समन्स बजावला आहे. १३ डिसेंबरपासून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वीच सरनाईक यांनी ईडीने पून्हा बोलवले नसल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचाः- महापालिकेची विशेष पथकं ठेवणार नाईट क्लबवर नजर

प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ईडीला पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड आढलले होते. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावला आहे. ईडीकडून फेअरमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहिण्यात आले आहे. तसंच पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागविण्यात आले आहे.  प्रताप सरनाईक यांना १३ तारखेपासून ते २१ डिसेंबरपर्यंत चौकशीला राहण्याचे आदेश दिले आहे. या पूर्वी ईडीने सरनाईक यांना चौकशीला बोलावले होते. त्यावेळी ३ समन्स बजावून ही सरनाईक हे चौकशीला हजर झाले नव्हते. त्यामुळे आता ते ईडीच्या चौकशीला वेळेत येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

हेही वाचाः- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

प्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड फेअरमाउंट, कॅलिफोर्निया  (Fairmont Bank, California) इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा