Advertisement

लक्ष द्या! नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांनी सहकार्य करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे

लक्ष द्या! नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

नवी मुंबई महापालिकेने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची, देखभाल दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे हाती घेतली आहेत.

त्यानुसार भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा बुधवार, 7 जून 2023 रोजी सकाळी 10:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत 12 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बुधवारी 12 तास बंद राहणार आहे.

तसेच, गुरुवार 8 जून 2023 रोजी शहरात सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यानुसार या कालावधीत नागरिकांनी पाण्याचे जतन व जपून वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, नवी मुंबई महानगरपालिका यांनी केले आहे.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा