सिडको वसाहतीत घरे घेतलेल्यांना सध्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यासोबतच बुधवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या घरमालकांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे आणि नवीन पनवेल वसाहतींमध्ये बुधवार ते गुरुवार या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्ला सिडको मंडळाने दिला आहे.
सिडको मंडळाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) पाणी मिळाल्यानंतर सिडको वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. सिडको मंडळाने संकेतस्थळावरून नागरिकांना आवाहन करताना भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र तसेच वायाळ येथील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविले आहे.
हेही वाचा