Advertisement

राज्यात दिवाळीतील ध्वनी पातळीत वाढ


राज्यात दिवाळीतील ध्वनी पातळीत वाढ
SHARES

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत राज्यभरात ध्वनी पातळीत वाढ नोंदवली गेली. 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या नोंदीनुसार दिवाळीतील दिवसाच्या ध्वनी पातळीत १.५ टक्के  तर रात्रीच्या ध्वनी पातळीत २.७७ टक्के वाढ झाली आहे. 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'नं संपूर्ण राज्यात १५२ ठिकाणी फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचे मापन केलं.

वसई-विरार इथं दिवसाच्या ध्वनी पातळीत सर्वाधिक १०.५५ टक्के  वाढ झाली. यंदा ७१.६६ डेसिबल ध्वनी पातळी आढळली. मीरा-भाईंदर येथे ध्वनी पातळीत ९.९० टक्के  इतकी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ झाली. इथं यंदा ७१.३२ डेसिबल इतकी ध्वनी पातळी होती.

दक्षिण मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील ध्वनी पातळी ७०.०९ डेसिबलवरून ७६.७९ डेसिबलपर्यंत पोहोचली. तीत ९.५६ टक्के  वाढ झाली. रात्रीच्या ध्वनी पातळीचा विचार करता दक्षिण मुंबई पहिल्या स्थानावर आहे. इथं रात्रीच्या ध्वनी पातळीत गतवर्षीच्या तुलनेत १९.३३ टक्के वाढ झाली. येथील ध्वनी पातळी ५९.०४ डेसिबलवरून ७०.४५ डेसिबलपर्यंत पोहोचली.

रात्रीच्या ध्वनी पातळीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ भिवंडी-निजामपूर येथे, तर तिसऱ्या क्रमांकाची वाढ मुंबईच्या पश्चिम उपनगरात दिसून आली. भिवंडी निजामपूर येथे यावर्षी ६३.४४ डेसिबल ध्वनी पातळी होती. पश्चिम उपनगरात यावर्षी ६५.२२ डेसिबल ध्वनी पातळी होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा