हीच खरी समाजसेवा

चेंबूर - डेंग्यू... मलेरिया... या आजारांचं मुंबईत सर्वच ठिकाणी प्रमाण वाढलंय. तर दोन वर्षांत चेंबूरच्या घाटला गाव परिसरात डेंग्यूनं चार ते पाच बळीही घेतलेत... या सगळ्याची जबाबदारी महापालिका किंवा सरकारवर ढकलणं, टीका करणं ही तर सोपी गोष्ट... पण काही जण त्यापलीकडे जाऊन विचार करतात. राजेंद्र नगराळे त्यापैकीच एक. स्वतःच्या खिशातून धूरफवारणी यंत्र विकत घेऊन त्यांनी परिसरात धूरफवारणी सुरू केलीय. अगदी शताब्दी रुग्णालयातही त्यांनी जाऊन स्वतः धूरफवारणी केलीये. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही वेळेवर फवारणी होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे... या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी स्वच्छता आणि धूरफवारणीसाठी केलेल्या या उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडं... त्यांच्या या कामाचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे.

Loading Comments