Advertisement

युनियन्सची दिवाळी, कर्मचाऱ्यांचं दिवाळं


युनियन्सची दिवाळी, कर्मचाऱ्यांचं दिवाळं
SHARES

मुंबई - महापालिका कर्मचाऱ्यांना 14 हजार बोनस देण्यात आला. मात्र कर्मचाऱ्यांना पालिकेतील विविध कामगार युनियनची शंभर ते पाचशे रुपयांपर्यंतची पावती घेण्यात आली. त्यामुळे कामगारांचा बोनस युनियनच्याच पथ्यावर पडलाय. यामुळे कर्मचारी नाराज झाले असले तरी युनियनची मात्र दिवाळी झालीय. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 रूपये बोनस मिळाला होता. मात्र यंदाच्या वर्षी 500 रुपये वाढ देण्यात आलीय. मात्र याचे श्रेय सत्ताधारी आणि युनियन दोघांकडून घेतलं जातंय. महापालिकेत राजकीय पक्षाच्या पाच ते सहा कामगार युनियन्स आहेत. प्रत्येक युनियननं प्रत्येक कामगाराला 100 ते 500 रुपयांची पावती घेण्यास भाग पाडलंय. तसंच कर्मचा-यांच्या बँक खात्यात बोनस जमा झाल्यानंतर 1500 रूपये टॅक्स कपातही करण्यात आलीय. युनियनच्या पावतीची रक्कम आणि टॅक्स कपात असा मिळून एकूण अवघा 12 हजार ते 12 हजार 500 रुपये बोनस मिळालाय, अशी माहिती पालिकेतल्या एका कर्मचा-यानं दिलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा