Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लसीकरणाची वेळ बुक करा

सरकार ने कोरोना हेल्पलाइन के लिए वाट्सएप नंबर की भी शुरुआत की है

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लसीकरणाची वेळ बुक करा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जातं आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. परंतु, सध्या लसीकरण करण्यासाठी नागरिकांना काही अडचणींना समोर जावं लागतं. त्यामुळं राज्य सरकारनं काही उपाय योजना आणत सर्वसामान्यांसाठी लसीकरणची नोंदणी करणं सोपं केलं आहे. अशातच आता नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची वेळ घेता येणार आहे, वापरकर्ते त्यांच्या जवळच्या केंद्रात माय गव्ह करोना हेल्पडेस्कच्या मदतीने नाव नोंदवू शकणार आहेत.

५ ऑगस्टला माय गव्ह व व्हॉटसअ‍ॅप यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा चॅटबोटच्या मार्फत दिली होती. ३२ लाख प्रमाणपत्रे त्यावरून डाऊनलोड करण्यात आली आहेत. मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क व्हॉटसअपवर तयार करण्यात आले असून मार्च २०२०  पासून त्यावर करोनाबाबतची खरी माहिती अफवा टाळण्यासाठी दिली जात आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ते उपयोगी ठरले आहे. ४ कोटी १० लाख वापरकर्त्यांंनी या उपयोजनाचा लाभ घेतला आहे.

मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क हा क्रांतिकारी मार्ग असून त्यातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. हॅपटिक व टर्न डॉट आयो यांचीही मदत यात घेण्यात आली आहे. आता त्यात लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय जवळची लसीकरण केंद्रेही शोधता येणार आहेत. त्यात कुठल्या वेळेला लस घ्यायची हेही ठरवता येईल. लसीकरण प्रमाणपत्रेही डाऊनलोड करता येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही व्यवस्था असून चॅटबोटच्या मदतीने ते साकारण्यात आले आहे. देश डिजिटलायझेशनमध्ये सक्षम होत असल्याचे ते निदर्शक आहे.

  • मायगव्ह कोरोना हेल्प डेस्क चॅटबोटशी संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपवर ९१— ९०१३१५१५१५ हा क्रमांक सेव्ह करायचा आहे.
  • त्यातून चॅटबोटच्या मदतीने पुढे जाण्यास मदत होईल व तुम्ही लसीकरणाची नोंदणी करू शकाल.
  • त्यातून एक ६ अंकांचा पासवर्ड तुम्हाला मोबाइलवर येईल त्यानंतर तारीख, वेळ व ठिकाण निवडता येणार आहे.
  • त्यासाठी पिनकोड व लशीचा प्रकार यांचा उल्लेख करावा लागणार आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा