Advertisement

राणीबागेत पेंग्विन पाहायला मोजा 100 रुपये


राणीबागेत पेंग्विन पाहायला मोजा 100 रुपये
SHARES

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) मध्ये येणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण राणीबागेतील प्रवेश शुल्क दहापटीने वाढवले जाणार आहे. विशेष म्हणजे पेंग्विन पाहण्यासाठी मोठ्यांना 100 रुपये आणि 12 वर्षांखालील मुलांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. राणीबागेतील प्रवेश शुल्क 2003 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यामुळे सध्या प्रौढांना 5 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांना 2 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामळे आता या प्रवेश शुल्कात वाढ केली जाणार आहे.
राणीबागेचा विकास मागील 2012 पासून सुरू आहे. सध्या या राणीबागेत 7 पेंग्विन पक्षी आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या पिंजाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच उद् घाटनानंतर नागरिकांना पेंग्विन पाहता येणार आहेत. राणीबागेचा विकास आणि पेंग्विनचे आगमन यामुळे राणीबागेतील प्रवेश शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रवेशशुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे. मागील 13 ते 14 वर्षांत प्रवेश शुल्कात वाढ केलेली नाही. त्यामुळे वाढ करण्याचे प्रस्तावित असले तरी गटनेत्यांच्या मंजुरीनंतरच याची अमलबाजावणी केली जाईल, असे उपायुक्त सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा