Advertisement

वसईत पासपोर्ट कार्यालय सुरू, दिवसाला 'इतके' अर्ज स्वीकारणार

शहरात स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती.

वसईत पासपोर्ट कार्यालय सुरू, दिवसाला 'इतके' अर्ज स्वीकारणार
SHARES

मागील काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पारपत्र कार्यालय अखेर वसईतील एव्हरशाईन इथे सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

सद्य:स्थितीत या ठिकाणी दिवसाला ४० जण पारपत्रासाठी अर्ज दाखल करू शकतील, अशी सुविधा करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील नागरिक विदेशात फिरण्यासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी जात असतात. त्यासाठी पारपत्राची गरज भासते. परंतु जिल्ह्य़ात पारपत्र काढण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने ठाणे व मालाड येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाया जात असतात.

शहरात स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. याबाबत पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनीही पाठपुरावा सुरू केला होता.

यावेळी प्रसंगी राजेंद्र गावित यांच्यासह प्रादेशिक पारपत्र अधिकारी मुंबई डॉ. राजेश गवांडे, नवी मुंबई टपाल विभाग अधिकारी सुश्री सरन्या, पोलीस सहआयुक्त श्रीकांत पाठक, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्ज्वला भगत यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.



हेही वाचा

नवी मुंबईचा होणार कायापालट, २०२३ स्वच्छता सर्वेक्षणासाठी तयारी जोमात

2023 Holiday Calendar: 2023 या नव्या वर्षात 'इतक्या' सार्वजनिक सुट्ट्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा