Advertisement

2023 Holiday Calendar: 2023 या नव्या वर्षात 'इतक्या' सार्वजनिक सुट्ट्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर

महाराष्ट्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे 2023 या वर्षासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

2023 Holiday Calendar: 2023 या नव्या वर्षात 'इतक्या' सार्वजनिक सुट्ट्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर
SHARES

डिसेंबर महिना सुरु झाला आहे. 2022 हे वर्ष मावळतीकडं झुकलं आहे. नवीन वर्ष 2023 सुरु व्हायला आता काहीच दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष प्रत्येकासाठीच नवीन ऊर्जा आणि आव्हानं घेऊन येतं.

नवीन वर्ष सुरु होताना या वर्षात नेमकं काय करायचं, याबाबत प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असू शकतो. पण या दरम्यान एक गोष्ट सर्वांसाठी समान असते, ती म्हणजे लाँग वीकेंडचं नियोजन...

प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात विश्रांतीची गरज असते. कामाच्या धबडग्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यावा, असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी उपयोगी ठरतात, त्या सुट्ट्या...

येत्या वर्षातही तुम्हाला जवळजवळ प्रत्येक महिन्याला भरपूर मोठ्या सुट्ट्या मिळणार आहेत. 

आता राज्य शासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जारी करण्यात आली असून त्यात 24 सुट्ट्या आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन शनिवार आणि रविवारी आहेत.

नव्या वर्षात महाशिवरात्री (18 फेब्रुवारी 2023) आणि मोहर्रम (29 जुलै 2023) या दोन सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी आहेत.

तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी 2023) आणि दिवाळी अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन (12 नोव्हेंबर 2023) या दोन दिवशी रविवार आहे. रविवारला जोडून चार सुट्ट्या (सोमवार) आल्या आहेत.

महाराष्ट्र दिन (1 मे 2023), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर 2023), गुरुनानक जयंती (27 नोव्हेंबर 2023) आणि ख्रिसमस (25 डिसेंबर 2023) अशा या सुट्ट्या आहेत. तर, 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाची मंगळवारी आणि पारशी नववर्ष दिनाची 16 ऑगस्ट 2023 (बुधवारी) अशी लागून सुट्टी आली आहे.

याव्यतिरिक्त 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची गुरुवारी, होळीची (धुळवड) 7 मार्च 2023 (मंगळवार), गुढी पाडव्याची 22 मार्च 2023 (बुधवार), रामनवमीची 30 मार्च 2023 (गुरुवार), महावीर जयंतीची 4 एप्रिल 2023 (मंगळवार), बकरी ईदची 28 जून 2023 (बुधवारी) रोजी सुट्टी आहे. तर, गुड फ्रायडे (7 एप्रिल 2023), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल 2023) आणि बुद्ध पौर्णिमा (5 मे 2023) या सुट्ट्या शुक्रवारी येतात.

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 (मंगळवार), ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबर 2023 (गुरुवार), दसरा 24 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) आणि दिवाळी – बलिप्रतिपदा 14 नोव्हेंबर 2023 (मंगळवार) अशा सुट्ट्या आहेत.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा