नगरसेवक लागले कामाला...

 Dadar
नगरसेवक लागले कामाला...
नगरसेवक लागले कामाला...
नगरसेवक लागले कामाला...
See all

साठेनगर - चेंबूरच्या साठेनगरमधील विविध कामांचा धडाका भाजपा नगरसेवक महादेव शिगवण यांनी लावला आहे. लादी बसवण्याची गरज नसतानाही लादी बसवण्याचे काम नगरसेवकांनी हाती घेतल्याचा आरोप स्थानिक रहिवासी जाधव यांनी केला आहे. विशेष म्हणजे पालिकेलाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाग आली. वारंवार गटारांच्या दुरुस्तीसाठी निवेदन देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या पालिका आणि नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटार दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा कामाचा घाट घातला जातोय का असा सवाल निर्माण झाला आहे.

Loading Comments