Advertisement

घाटकोपर रेल्वे स्थानकात उपचार एक रूपयात!


घाटकोपर रेल्वे स्थानकात उपचार एक रूपयात!
SHARES

मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकलने दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रचंड गर्दी आणि ट्रेन पकडण्याची घाई असल्याने काही प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागते, तर काहींचा दुर्दैवाने बळी जातो. अशावेळेस प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मध्य रेल्वेने मोजक्या स्थानकांवर 1 रुपयात वैद्यकीय सेवा देण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाला बुधवारी घाटकोपर स्थानकातून सुरूवात करण्यात आली.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या किंवा जवळपासच्या परिसरातील नागरिकांची प्रकृती खालावल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी मध्य रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रवास करताना जवळ पैसे नसलेल्यांना रेल्वेच्या या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.

प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मध्य रेल्वेने एका खासगी संस्थेसोबत करार केला आहे. त्याअंतर्गत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी 'एका रुपयात दवाखान्याची सुरुवात' घाटकोपर स्थानकापासून केली आहे. मध्य रेल्वेवरील दादर, कुर्ला, मुलुंड आणि वडाळा या स्थानकांवर येत्या दोन महिन्यांत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दवाखान्यात या सुविधा मिळतील -
या दवाखान्यात रेल्वे अपघात, चक्कर येणे, फीट, छातीदुखी तसेच प्रसुतीसंदर्भात त्वरित उपचार करण्यात येतील. प्रत्येक दवाखान्यात एमबीबीएस आणि एमडी डिग्री असलेले डॉक्टर रुग्णांच्या सेवेत हजर असतील. त्याशिवाय 24 तास सुरु राहणाऱ्या या दवाखान्यांमध्ये दर दिवशी त्वचारोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञही असतील.

मध्य आणि हार्बरच्या 19 स्थानकांवर लवकरच या वैद्यकीय सेवेच्या उपक्रमाचा विस्तार होईल. प्रत्येक स्थानकावर दरदिवशी किमान 100 प्रवाशांना तपासले जाणार आहे. या दवाखान्यांमध्ये रक्त तपासणीसह औषधांची दुकानंही उपलब्ध असतील. तसेच यामध्ये पॅथोलॉजी किट्सही मिळेल. त्यामुळे प्रवाशांना आता अपघात किंवा दुखापत झाल्यास रेल्वे स्थानकावरच तात्काळ सेवा उपब्लध होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा