Advertisement

अँटॉप हिल परिसरात वीज चोरणाऱ्यांना अटक


अँटॉप हिल परिसरात वीज चोरणाऱ्यांना अटक
SHARES

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात बुधवारी रात्री वीज चोरणाऱ्या १२ जणांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी छापे टाकत वीज चोरी करणाऱ्या १२ जणांसह काही बेस्ट कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये वीज चोर माफिया देखील होते, ज्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.


इतक्या किमतीची वीज चोरीला

अस्लम शेख, जावेद सय्यद, गुसाम नबी, मोहम्मद युसूफ अली अन्सारी, अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी अँटॉप हिल परिसरातील बेस्ट उपक्रमाचा ADP क्र. A4936 मध्ये अनधिकृतरित्या जोडणी करून 34274 एवढ्या वीज युनिटची चोरी केली. त्यांनी चोरी केलेल्या विजेची किंमत तब्बल ४,१७,३३३ रुपये इतकी आहे.


अँटॉप हिल परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी सापळा रचून छापेमारी केली. पोलिसांना पाहताच घटनास्थळी धावपळ झाली पण यात पोलिसांनी १२ लोकांना ताब्यात घेतलं आहे.


गुन्हा दाखल

याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपींविरोधात कलम १३५, १३८,१५० विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलिस या सगळ्यांचा कसून तपास करत आहे. तर यात आणखी कोणती टोळी आहे का? याचाही पोलिस तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा