Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या पगार येत्या गुरुवारपर्यंत होणार

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांकरिता दिलासादायक घोषणा दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या पगार येत्या गुरुवारपर्यंत होणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाची बाजी लावत एसटी कर्मचारी वाहतूक सेवा देत होते. मात्र या कर्मचाऱ्यांवर पगार न मिळाल्यानं आर्थिक संकट ओढवलं होतं. त्यामुळं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांकरिता दिलासादायक घोषणा दिली. काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच ८ऑक्टोबर जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

याबाबत नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. तर उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं. मागील साडेपाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटीचा पूर्णपणे प्रवास बंद होता. अगोदरच एसटी प्रचंड तोट्यात होती. त्यात हे कोरोनाचं संकट आलं. त्यामुळे एसटी आणखी तोट्यात गेली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर नुकतंच परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ट्वीट अनिल परब यांनी केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा