Advertisement

कांद्यानं आणलं डोळ्यात पाणी, भाव कडाडले

मुंबईसह राज्यात कांद्याचे भाव पुन्हा कडाडले आहेत. कांदा थेट ४० ते ४५ रुपयांनी विकला गेला. हाच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोनं विकला जातोय.

कांद्यानं आणलं डोळ्यात पाणी, भाव कडाडले
SHARES

गेल्या कित्येक दिवसांपासून दरवाढीसोबत पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या कांद्यानं पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. मुंबईसह राज्यात कांद्याचे भाव पुन्हा कडाडले आहेत.


पंधरा रुपयांनी उसळी

देशातून मोठ्या प्रमाणात होणारी निर्यात, दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, मुसळधार पावसामुळे साठवण चाळीत सडलेला ५० टक्के कांदा या कारणांमुळे घाऊक बाजारात कांद्यानं थेट पंधरा रुपयांनी उसळी घेतली. त्यामुळे घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये प्रति किलोनं विकला जाणारा कांदा थेट ४० ते ४५ रुपयांनी विकला गेला. हाच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोनं विकला जातोय.


...तर होतील दर कमी

कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे भाववाढ झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर हे भाव कमी होतील अशी अपेक्षाही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कांद्याचे दर किलोला ६० ते ८० रुपयांवर गेले आहेत. येत्या ऑक्टोबरमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आवक सुरू झाल्यावर कांद्याचे दर निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास केंद्रीय अन्न मंत्री के. व्ही. थॉमस यांनी मंगळवारी व्यक्त केला.


काय बोलले शरद पवार?

कांद्याच्या दरवाढीवर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कांद्याचे दर वाढल्यानं शेतक-यांना फायदा होत आहे, त्यांचा एवढा गवगवा करायची काय गरज आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. जेव्हा कांद्याची किंमत दहा पैसे किलो होते तेव्हा कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. त्यावेळी कुणीच विचार करत नाही. आणि आता शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर इतका बुवा का केला जातोय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा