मोकळ्या भूखंडांचा प्रस्ताव टांगणीवर

  CST
  मोकळ्या भूखंडांचा प्रस्ताव टांगणीवर
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईतील मोकळ्या भूखंडांची उत्तम देखभाल केलेल्या संस्थांना हंगामी तत्वावर भूखंड देण्याचा निर्णय सुधार समितीत घेण्यात आला होता. मात्र गुरुवारी झालेल्या महासभेत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आता पालिका निवडणुकीनंतरच हा प्रस्ताव सभागृहात आणला जाण्याची शक्यता आहे.

  पालिकेनं 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भूखंड देण्याचा निर्णय घेतला होता. संस्थांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असल्याचंही या वेळी ठरलं. हा प्रस्ताव गुरुवारी पालिका सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव थांबवून ठेवला आहे.

  पालिकेनं मोकळी मैदानं, उद्यानं हंगामी तत्वावर देण्याबाबतचे नवे धोरण तयार केले आहे. त्यात संस्थांना भूखंड देण्याचे निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषानुसार महापालिका मुंबईतील  216 मोकळे भूखंड ताब्यात घेणार आहे. यातील सुमारे 128 भूखंड आतापर्यंत महापालिकेनं ताब्यात घेतले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.