Advertisement

देवनार डंपिंग ग्राऊंडवरून स्थायी समितीत भडका


देवनार डंपिंग ग्राऊंडवरून स्थायी समितीत भडका
SHARES

मुंबई - देवनार डंपिंग ग्राऊंडवर सातत्याने लागणाऱ्या आगीचा भडका शुक्रवारी पालिकेच्या स्थायी समितीत उडाला. डंपिंग ग्राऊंडवर धुमसत असतानाही पालिकेकडून मात्र काणाडोळा केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह इतर उपाययोजना करण्याकडे पालिका गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप करत सपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत भाजप-शिवसेनेलाही लक्ष केले. त्याला उत्तर म्हणून तर भाजपचे मनोज कोटक यांनी या आधी लागलेल्या आगीची चौकशी अहवाल सादर करावा आणि मग आग कोण आणि कशा लावतात हे उघड होईल असं म्हणताच आगीचा भडका वाढला. या वेळी त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे सपाकडे होता. आग कोण आणि का लावत आहे, हे या अहवालातून पुढे येणार असल्यानेच हा अहवाल पालिकेकडे, स्थायी समितीकडे पोलीस प्रशासनाकडून सादर केला जात नसल्याचा आरोपही या वेळी त्यांनी केला.

एका बड्या राजकीय प्रस्थाबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भावाचे नाव ही या अहवालात असून त्यांच्या वरदहस्तामुळेच आगी लागत असल्यानंही अहवाल दडवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर यावरून चांगलाच गोंधळ झाला आणि शेवटी सर्वच पक्षानी हा अहवाल त्वरीत सादर करण्याची मागणी केली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पोलिसांकडून हा अहवाल मागवून घेत तो स्थायी समितीसमोर सादर करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा