शेतकरी मारहाणीच्या विरोधात निषेध रॅली

मुंबई - मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीच्या विरोधात विधानभवनात निषेध रॅली काढण्यात आली आहे. या निषेध रॅलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश होता. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीविरोधात घोषणाबाजी केली.

मंत्रालयात गुरुवारी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा दावा शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी केला होता. मात्र या शेतकऱ्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शेतकऱ्याला भेटण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते मरिन लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी रामेश्वर भुसारेबद्दल विचारणा केली असता पोलीस अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तर देत शेतकऱ्याला न्यायालयात घेऊन गेले आहेत असे उत्तर दिले. मात्र या उत्तरावर अजित पवार यांचे समाधान झाले नाही. अजित पवार यांनी थेट शेतकऱ्याला फोन लावला. शेतकऱ्याने सांगिलते की, मला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. हे उत्तर ऐकताच अजित पवार यांचा पारा चढला. अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्याला धारेवर धरत विरोधी पक्ष नेते असताना पोलीस अधिकारी खोटे बोलत आहेत. अशा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे असे सुनावले.

अधिक वाचा

शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी चौकशीचे आदेश - मुख्यमंत्री

https://www.mumbailive.com/mr/city/farmers-beating-in-mantralaya-police-lie-to-opposition-leaders-9533

Loading Comments