Advertisement

बेकायदा पार्किंग विरोधात वरळीत आंदोलन

दंडाची रक्कम थेट १० हजार रुपयांपर्यंत करण्यात आल्यानं कारवाईचा निषेध होत आहे. तसंच, मंगळवारी वरळी विभागात या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं.

बेकायदा पार्किंग विरोधात वरळीत आंदोलन
SHARES

मुंबईत बेशिस्त पार्किंगला कायद्याचा बडगा दाखवण्यासाठी पालिकेनं दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. महापालिकेच्या निर्णयानुसार सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाई केली जात आहे. मात्र, पालिकेच्या या कारवाईला तीव्र विरोध होऊ लागला आहे. दंडाची रक्कम थेट १० हजार रुपयांपर्यंत करण्यात आल्यानं कारवाईचा निषेध होत आहे. तसंच, मंगळवारी वरळी विभागात या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं.

वाहनतळ सुविधा

पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. महापालिकेनं पीपीएल तत्त्वावर २८ ठिकाणी उपलब्ध पार्किंगच्या ५०० मीटर परिसरात नो पार्किंग झोन जाहीर केला आहे. त्या परिसरात अथवा मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बेकायदा वाहनांवर रविवारपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, सर्वच पक्षीय नगरसेवकांनी या कारवाईला अंमलबजावणीपूर्वी विरोध दर्शविला होता. गटनेत्यांनी याबाबत निर्णय घेण्याआधीच कारवाईला सुरुवात करण्यात आली. मात्र या कारवाईविरोधात वरळी येथे स्थानिक लोकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्याचप्रमाणं, वाहनांच्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था नसताना ही कारवाई होत असल्याचा आरोप या आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला़.

दंड वसूल

नो पार्किंग कारवाईच्या पहिल्याच दिवशी ५६ वाहनांवर कारवाई करत १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसंच, सोमवारी दिवसभरात ३५ चार चाकी, ३ तीन चाकी व ४२ दुचाकी यांसह एकूण ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ लाख ७० हजार ३४० रूपये दंड वसूल करण्यात आला.हेही वाचा -

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

चर्नीरोड स्थानकातील मोबाइल चोरीप्रकरणी जुळ्या भावांना अटकRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा