राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खूश खबर दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के इतका झाला आहे.

SHARE

अर्थ विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय जारी केल्याची माहिती अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जानेवारी २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन संरचनेनुसार मूळ वेतनावरील महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. 

ही वाढ १ जुलै २०१९ पासून रोखीने देण्यात येईल. तर १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.हेही वाचा-

तयार व्हा, गोराई ते बोरीवली, मालाड ते मार्वे दरम्यान रोप वे प्रवासाला!

श्रीमंतांना द्यावा लागणार अमेरिकेपेक्षाही अधिक करसंबंधित विषय
ताज्या बातम्या

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
00:00
00:00