Advertisement

श्रीमंतांना द्यावा लागणार अमेरिकेपेक्षाही अधिक कर

वार्षिक २ ते ५ कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांवर ३ टक्के सरचार्ज लागणार आहे. तर ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंतांना आता ७ टक्के सरचार्ज द्यावा लागणार आहे.

श्रीमंतांना द्यावा लागणार अमेरिकेपेक्षाही अधिक कर
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात काहीच बदल न करता सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, सरचार्ज वाढवून श्रीमंतांवरील कराचा बोजा वाढवला आहे. वार्षिक २ कोटी ५ कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्या श्रीमंतांना आता ३९ टक्के कर द्यावा लागणार आहे. तर ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ४२.७४ टक्के कर आकारला जाणार आहे. म्हणजे अमेरिकेपेक्षाही देशातील श्रीमंतांना अधिक कर द्यावा लागणार आहे. अमेरिकेत श्रीमंतावर ४० टक्के कर आकाराला जातो.


५ लाखांपर्यंत करमुक्त

अर्थसंकल्पात ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. म्हणजे ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कसलाही कर द्यावा लागणार नाही. ५ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना २०.८ टक्के कर द्यावा लागणार आहे. तर १० लाख ते ५० लाख रुपये असणाऱ्यांवर ३१.२० टक्के कर आकारला जाणार आहे. ५० लाख ते १ कोटी उत्पन्नावर ३४.३२ टक्के आणि १ कोटी ते २ कोटी रुपये उत्पन्नावर ३५.८८ टक्के कर आकारला जाईल.


श्रीमंतावर सरचार्ज

२ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर सरकार सरचार्ज लावला आहे. वार्षिक २ ते ५ कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांवर ३ टक्के सरचार्ज लागणार आहे. तर ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंतांना आता ७ टक्के सरचार्ज द्यावा लागणार आहे. म्हणजे २ ते ५ कोटी रुपये उत्पन्नधारकांना ३९ टक्के तर ५ कोटींपेक्षा अधिक उत्पन्नधारकांना ४२.७४ टक्के कर द्यावा लागणार आहे.हेही वाचा -

आयएमईआय नंबर बदलला तरी मोबाइल ट्रेस होणार

शेअर बाजारात २ दिवसांत ५ लाख कोटींचा चुराडा कसा झाला?

संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा