Advertisement

डेब्रिज, नालेसफाई कामं ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकित यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

डेब्रिज, नालेसफाई कामं ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
SHARES

येत्या पावसाळ्यात (Mumbai Rain) पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व डेब्रिज काढण्याची कामे आणि नालेसफाईची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

मुंबई महानगरातील (BMC) पावसाळापूर्व कामांचा विशेषतः डेब्रिज व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबई महानगरात पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीए, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस या विविध विभागांनी कामांना गती द्यावी.

मुंबई महानगरात डेब्रिज तयार होण्याच्या ४५० जागा असून ३१ मे पर्यंत हे डेब्रिज साफ करण्याची कार्यवाही एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेने करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

कांदिवली भागात मेट्रोची जी कामे सुरू आहेत, त्याठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यात यावेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गामधील ४७ कल्व्हर्ट तसेच मुंबई महानगरातील रेल्वे ट्रॅकवरील ४० कल्व्हर्ट स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाला दिले.

डास, मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा, असे सांगून ज्या भागांमध्ये मेट्रोसह (Mumbai Metro) इतर सार्वजनिक कामे सुरु असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेऊन डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी संबंधित कंत्राटदारांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारतींवर बांधकामासाठी लावण्यात आलेल्या क्रेन्समुळे दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संबंधित विकासकांना सूचना द्याव्यात असंही सांगितले.

याशिवाय अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग, कोळीवाड्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी अगोदरच सुविधा उपलब्ध करून ठेवण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.



हेही वाचा

पिण्याच्या पाण्याबाबत पालिकेनं घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

आता नवीन मेट्रो स्टेशनबाहेरही सायकल भाड्यानं मिळणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा