Advertisement

आता नवीन मेट्रो स्टेशनबाहेरही सायकल भाड्यानं मिळणार

मेट्रोसोबतच राज्य सरकारनं मुंबईकरांना आणखी एक भेट दिली आहे.

आता नवीन मेट्रो स्टेशनबाहेरही सायकल भाड्यानं मिळणार
SHARES

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील दोन नवीन मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला. दहिसर-कांदिवली-गोरेगाव मेट्रो मार्ग ८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारपासून मुंबईकरांसाठी सुरू झाला आहे. मेट्रोसोबतच राज्य सरकारनं मुंबईकरांना आणखी एक भेट दिली आहे.

मुंबईत नवीन मेट्रो स्थानकं बांधण्यात आली आहेत. तिथून लोकांना बस किंवा ऑटो रिक्षानं त्यांच्या घरी किंवा ऑफिसला जाता यावं यासाठी एक संकल्पना सुरू केली आहे. मेट्रो स्थानकांवर सायकल सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सायकल सुविधा मेट्रो स्टेशनवर My Bike (MYBYK) अॅपद्वारे सुरू करण्यात आली आहे.

या सायकल सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये MYBYK नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही अॅपद्वारे ही सायकल अनलॉक करू शकता आणि लॉक उघडताच तुमचे भाडे सुरू होईल. सायकलचे भाडे खूपच कमी आहे. तुम्ही प्रति तास २ रुपये सायकल भाड्याने घेऊ शकता.

जोपर्यंत तुमच्याकडे सायकल आहे. तुम्हाला प्रति तास २ रुपये मोजावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही तुमची सायकल मेट्रो स्टेशनखाली पार्क करू शकता. मेट्रो स्टेशनच्या खाली असलेली ही सायकल सुविधा मुंबईकरांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ तर वाचेलच पण भाड्यातही बचत होणार आहे.हेही वाचा

२ दिवसात 'इतक्या' प्रवाशांनी केला नव्या मेट्रोनं प्रवास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा