Advertisement

कचरामुक्तीसाठी खत निर्मितीचा तोडगा


कचरामुक्तीसाठी खत निर्मितीचा तोडगा
SHARES

मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडच्या विषयावर या-ना त्या कारणाने चर्चा तर होत असते. यावरून आरोप-प्रत्यारोपही होत असतात. पण यावर तोडगा काय? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. त्यासाठीच मुंबईच्या एफ-दक्षिण विभागात प्रायोगिक तत्त्वावर कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. या खताचा वापर परळ पुलाजवळील गोखले सोसायटी लेनमधील झाडांसाठी केला जात आहे.

हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. ज्यात कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. या खताचा वापर विभागातील उद्यानांत केला जात आहे. हा प्रयोग काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आला आहे. जवळपास 4.25 लाख लोकसंख्या असलेल्या एफ-दक्षिण विभागातून दररोज 290 टन कचरा निघतो. त्यामधील 4 टन कचरा हा फक्त विभागातील 122 हॉटेल्समधून टाकला जातो. पालिकेने 150 घरांमागे एक सामाजिक संस्था नेमली आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका त्या संस्थेला दर महिन्याला 5400 रुपये पगार देते, तर स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी महिन्याला 600 रुपये दिले जातात, अशी माहिती विभागातील सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) परशुराम कुराडे यांनी दिली.

हा प्रयोग तत्कालीन विभागातील नगरसेवक नाना आंबोले यांनी सुरू करण्याचे ठरवले होते. महापालिकेमध्ये त्या वेळी डम्पिंग ग्राउंड हा विषय खूप गाजत होता. या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि विभागातील काचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी हा पर्याय निवडला. याचा फायदाही विभागातील रहिवासी आणि पालिकेला होत आहे. परिसरातच कचऱ्याची विल्हेवाट होत असल्याने आता कचऱ्याच्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे खर्चही वाचतो आणि पर्यावरण ही सुंदर राहते

- नाना आंबोले, माजी नगरसेवक

हा उपक्रम राबण्यासाठी तन्वी नागरी सेवा सहकारी या सामाजिक संस्थेची मदत घेण्यात आली आहे. ही संस्था वॉर्ड क्रमांक 203 च्या परळ विभागात कार्यरत आहे. या विभागातील 256 इमारतींमधून जवळपास 4 मॅट्रिक टन कचरा निघतो. त्या विभागात कचरा जमा करण्याचे 7 केंद्र आहेत. त्याचे आज कचरा वर्गीकरण केंद्र बनवले आहे. ज्यात 288 कर्मचारी विभाग कचरामुक्त करण्यासाठी काम करतात, अशी माहिती तन्वी नागरी सेवा सहकारी संस्थेचे सचिव योगेश पुरबिया यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा