दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील बाणगंगा तलावाच्या भिंतीचा काही भाग रविवारी कोसळला, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचेही वृत्त आहे.
तलावाच्या परिसरातील महालक्ष्मी मंदिराच्या जवळच ही भिंत आहे.
दक्षिण मुंबईतील ग्रॅंटरोड पश्चिम येथील मलबार हिल परिसरात वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या जवळची संरक्षक भिंत रविवारी पहाटे पावसामुळे कोसळली. संरक्षक भिंतीचा सुमारे 10-15 फूट भाग कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
घटनास्थळी पालिकेच्या डी विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिसर सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेडिंग केले आहे. नागरिकांनी त्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.