दहिसरमध्ये स्कायवॉकचा स्लॅब कोसळला

दहिसर - दहिसर रेल्वे स्टेशनच्या समोरील स्कायवॉकचा 10 फुट लांबीचा स्लॅब मंगळवारी रात्री अचानक कोसळला. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी आणि मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने स्कायवॉकचा मलबा हटवला. 8 वर्षांपूर्वी एमएमआरडीएने हा स्कायवॉक बांधला होता. त्यानंतर या स्कायवॉककडे कोणीच लक्ष दिलं नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading Comments