Advertisement

रखडलेल्या 'या' पादचारी पुलाचं काम वर्षाअखेरीस पूर्ण होणार


रखडलेल्या 'या' पादचारी पुलाचं काम वर्षाअखेरीस पूर्ण होणार
SHARES

जोगेश्वरी पूर्व ते इस्माईल युसूफ महाविद्यालयापर्यंत होणाऱ्या पादचारी पुलाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. या पादचारी पुलाच्या रखडलेल्या कामामुळे वेस्टन एक्स्प्रेस महामार्गावर जबरदस्त वाहतूककोंडी व्हायची. प्रवाशांना आता हा त्रास सहन करावा लागणार नाही, कारण वर्षाअखेरीस या पादचारी पुलाचं काम मार्गी लागणार आहे, असं आश्वासन मुंबई महानगपालिकेच्या ब्रिज विभागाचे प्रमुख कोरी यांनी दिलं.


राज्यमंत्र्यांमुळे कामाला गती

राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अापल्या मंत्रालयीन दालनात मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह बैठक अायोजित केली होती. या बैठकीत वायकर यांनी जोगेश्‍वरी विधानसभा श्रेत्रातील जोगेश्वरी पूर्व ते इस्माईल युसुफ महाविद्यालयापर्यंतच्या पादचारी पुलाच्या कामाला विलंब होत असल्याचं आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी महापलिकेच्या पूल विभागाचे प्रमुख कोरी यांनी या पादचारी पुलाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करणार, असं आश्वासन दिलं.


कंत्राटदारांना कामावरून काढणार

पादचारी पुलाचे काम या वर्षाअखेरीस पूर्ण नाही झाले तर कंत्राटदारांना काढून टाकण्यात येईल, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी कोरी यांना दिले. त्यामुळे या पादचारी पुलाचे काम या वर्षाअखेरीस पूर्ण होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


बैठकीला यांची उपस्थिती

या संयुक्त बैठकीत महापालिकेच्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए, आरे प्रशासनाचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग तसेच आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसह नगरसेवक प्रवीण शिंदे, सदानंद परब, रेखा रामवंशी, शाखाप्रमुख बाळा नर यांसारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट

मुंबईतून ७/१२ उतारा होणार हद्दपार!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा