Advertisement

मुंबईतील 'येथील' पादचारी मार्गिकेचा प्रयोग फसणार?

मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील ऐतिहासिक इमारती आणि स्थळ पाहण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकांची मोठी गर्दी असते.

मुंबईतील 'येथील' पादचारी मार्गिकेचा प्रयोग फसणार?
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील ऐतिहासिक इमारती आणि स्थळ पाहण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकांची मोठी गर्दी असते. नेहमीच हा परिसर पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. त्यामुळं या परिसरातून पादचाऱ्यांना मुक्तपणे ये-जा करता यावी यासाठी एक मार्गिका आखण्यात आली होती. ही मार्गिका केवळ पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही मार्गिका आता वाहतूक बेशिस्त आणि फेरीवाल्यांचं अतिक्रमणामुळं फसण्याच्या मार्गावर आहे.

योजना फसण्याची शक्यता 

सीएसएमटी इथं पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गिकेतून वाहनांची वर्दळ सुरू असतो. तसंच, महापालिका आणि वाहतूक पोलिसही याकडं लक्ष देत नसल्याचं समजतं. त्यामुळं ही योजना फसण्याची शक्यता आहे. पर्यटकांना हा परिसर कॅमेऱ्यात टिपायचा असतो. पण, त्यासाठी नेमकी जागा सापडत नाही. त्यामुळे ते भांबावून कुठे तरी उभे असतात. कामावर जाणारे कर्मचारी कसेबसे गर्दीतून वाट काढतात. या सगळ्याला शिस्त लावण्यासाठी आणि पादचाऱ्यांना अधिक सुरक्षितपणे, सुलभतेनं व सहजतेनं चालता यावं, यासाठी या परिसरातील पादचारी मार्गांमध्ये प्रायोगिक स्वरूपात बदल केले आहेत.

पादचाऱ्यांना फायदा

या भागात भडक पिवळ्या रंगाचे पट्टे आखून पादचाऱ्यांसाठी मार्गिका तयार करण्यात आली होती. दिवाळीपासून या प्रयोगाला सुरुवात झाली. या बदलाचा फायदा पादचाऱ्यांना होतो आहे. मात्र पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या अनास्थेबरोबरच बेशिस्त वाहनचालक आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हा प्रयोग धोक्यात आला आहे.

बेशिस्त दुचाकीस्वार

वाहतुकीचा मर्यादित वापर असणाऱ्या जागेवर पिवळ्या रंगाचे पट्टे आखून त्या जागा पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. मात्र, या जागेवर आता फेरीवाले बसत आहेत. त्यामध्ये बेशिस्त दुचाकीस्वारही या जागेत अतिक्रमण करत आहेत. वाहनांना कमी जागा उरल्यामुळं वाहतूक कोंडी होत असल्याचं कारण सांगून पिवळ्या पट्ट्याच्या बाजूस असलेल्या कुंड्या, दगड आत ढकलण्यात आले. तर बस आगाराच्या बाहेर सुलभ स्वच्छतागृहाजवळील मोकळ्या जागेत फेरीवाल्यांनी आपली दुकानं लावलेली आहेत.

पादचाऱ्यांकरिता आखून दिलेल्या या पिवळ्या पट्ट्यांवर पुरेशी साफसफाई देखील होत नसल्यानं काही ठिकाणी त्यांचा रंग उडून ते पुसट झाले आहेत. तर बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांवर गर्दुल्ले, भिकारी पथारी पसरताना दिसतात.



हेही वाचा -

भाऊ बहिणीची गाळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत

मिशन पूर्ण, उद्यापासून बोलणार नाही- संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा