Advertisement

पेंग्विन मृत्यूप्रकरणी पालिका आयुक्तांना नोटीस


पेंग्विन मृत्यूप्रकरणी पालिका आयुक्तांना नोटीस
SHARES

मुंबई - पेंग्विन मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं घेतलीय. त्यानुसार प्राधिकरणानं पालिका आयुक्तांना नोटीस बजावलीय. पेंग्विनच्या देखभालीत, त्यांच्या व्यवस्थेत हलगर्जीपणा झालाय का? असा प्रश्न या नोटीसमध्ये विचारण्यात आलाय. तर पेंग्विनना ठेवण्यात येणारी जागा योग्य आहे का? तसंच पेंग्विनचा मृत्यू असुविधेमुळे झाला आहे का? असाही सवाल प्राधिकरणानं पालिका आयुक्तांकडे केलाय. या नोटीसचं उत्तर आता पालिकेकडून काय येतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणाराय.

प्राधिकरणानं एकीकडे नोटीस पाठवली असतानाच दुसरीकडे पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी थेट लोकायुक्तांकडेच यासंबंधी तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार पेंग्विन आणण्यापासून ते पेंग्विनच्या देखभालीपर्यंतच्या सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा आरोपही छेडा यांनी तक्रारीद्वारे केलाय. पेंग्विनचा मृत्यू राणीबागेतील असुविधांमुळेच झाल्याचंही त्यांनी तक्रारीत नमूद केलंय. दरम्यान या तक्रारीची लोकायुक्त कार्यालयानं गंभीर दखल घेतलीय. याप्रकरणी राणीबागचे उपअधीक्षक डाँक्टर संजय त्रिपाठी यांना समन्स बजावण्यात आलीय. तर शुक्रवारी एक वाजता यासंबंधी सुनावणी होणाराय, अशी माहिती छेडा यांनी दिलीय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा