Advertisement

मालाड, बोरिवलीत माकडांचा उच्छाद

मालाड आणि बोरिवली परिसरात माकडांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

मालाड, बोरिवलीत माकडांचा उच्छाद
SHARES

लॉकडाऊनमुळे मुंबईतील सार्वजनिक उद्याने आणि समुद्रकिनारे अजूनही बंद आहेत. यासह, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सध्या बंद आहे. पण आता या परिसराच्या आसपास राहणाऱ्यांना नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे. 

वस्तुस्थिती अशी आहे की, बोरिवली पूर्व कस्तुरबा मार्ग क्रमांक ६ वरील गीता भवन इथल्या रहिवाशांनी एक व्हिडिओ पाठवला आहे. ज्यामध्ये खाद्यपदार्थ खाणारी अनेक माकडं रहिवशांना त्रास देत आहेत. बोरिवली पूर्वेतील रहिवासी म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपासून वानर खाद्यपदार्थांच्या शोधात घरे, बाजारपेठेत आणि बाजारात घुसले आहेत.

नागरिकांचं म्हणणं आहे की, नॅशनल पार्कमध्ये माणसांची रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे माकड आणि अशा अनेक प्राण्यांना धान्य / खाद्यपदार्थ मिळणं बंद झालं आहे. म्हणूनच, ही माकडं रहिवासी परिसरात शिरकाव करत आहेत. 

भविष्यात ही माकडं ज्येष्ठ नागरिकांवर आणि मुलांवर हल्ला करू शकतात. काही दिवसांपूर्वी मालाड भागातील असाच व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही माकडं लोकांच्या घरांच्या खिडक्यांवर येत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर मुंबईच्या पूर्वेकडील बोरिवली भागातील एक अभयारण्य आहे. हे बर्‍याच प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जॉगिंग ट्रॅक आहे. 

उत्तर मुंबईत सासंद गोपाल शेट्टी यांनी संबंधित अधिकारी, मनपा आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी ३ जुलै १७ जुलै रोजी एक पत्र लिहिलं होतं.

सासंद गोपाळ शेट्टी यांच्या मागणीनुसार, संजय नॅशनल पार्क माणसांसाठी उघडण्यात यावं. जेणेकरून माणसांमार्फत प्राण्यांसाठी खायची व्यवस्था होईल. त्यामुळे प्राणी जंगलाबाहेर येणार नाहीत.



हेही वाचा

एरंगल समुद्रकिनारा पर्यटन क्षेत्र म्हणून होणार विकसित

मुंबईतील ‘या’ जुन्या इमारतीतील रहिवाशांचं होणार पुनर्वसन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा