Advertisement

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्ये काय सुरू? काय बंद?

केंद्र सरकारच्या यादीनुसार देशातील १३० जिल्हे रेड झोनमध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये, तर ३१९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये येत आहेत. या जिल्ह्यात ४ मे पासून झोननुसार कुठल्या सेवा सुरू राहतील आणि कुठल्या सेवा बंद राहतील याची माहिती आपण घेऊयात.

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्ये काय सुरू? काय बंद?
SHARES

देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने केंद्र सरकारने लाॅकडाऊन सुरूच ठेवण्याचा निर्णय शुक्रवार १ मे २०२० रोजी घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने पत्रक काढत देशव्यापी लाॅकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली. यामुळे ३ मे रोजी संपणारा लाॅकडाऊन आता १७ मे पर्यंत सुरूच राहणार आहे. या लाॅकडाऊन दरम्यान ग्रीन आणि आॅरेंज झाेनध्ये अंशत: सवलती केंद्र सरकारने दिल्या आहेत. परंतु रेड झोनमधील रहिवाशांना लाॅकडाऊनचे कडक निर्बंध यापुढेही पाळावीच लागणार आहेत. 

मुंबई शहर-उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिविली, पालघर, नवी मुंबई, पुणे शहर आणि ग्रामीण इत्यादी परिसर रेड झोनमध्ये येत असल्याने परिसरात कडक नियम लागू असणार आहेत. केंद्र सरकारच्या यादीनुसार देशातील १३० जिल्हे रेड झोनमध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये, तर ३१९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये येत आहेत. या जिल्ह्यात ४ मे पासून झोननुसार कुठल्या सेवा सुरू राहतील आणि कुठल्या सेवा बंद राहतील याची माहिती आपण घेऊयात.

तिन्ही झोनमध्ये ‘या’ सेवा बंद

  • विमान सेवा
  • रेल्वे सेवा
  • एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारी रस्ते वाहतूक
  • शाळा, कॉलेज, क्लासेस
  • हॉटेल, रेस्टॉरंट
  • सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल अशी सर्व ठिकाणं
  • सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम
  • सिनेमा, नाटक थिएटर
  • मॉल
  • व्यायामशाळा
  • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

काय सुरू?

  • रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील औषधांची दुकानं सुरूच राहतील
  • इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना परराज्यात जाण्यासाठी राज्य सरकारतर्फे बस, विशेष रेल्वेला परवानगी

रेड झोन:

काय सुरू?

  • वीज, पाणी, सॅनिटायझेशन, वेस्ट मॅनेजमेंट
  • स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने चालक अधिक दोघांना वाहनातून जाण्यास परवानगी
  • दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी
  • बँक, विमा आदी वित्तीय संस्था
  • इंटरनेट, पोस्टल सेवा
  • आयटी, डाटा-कॉल सेंटर्स,
  • खासगी सिक्युरिटी, स्वत: चा व्यवसाय करणाऱ्यांना सूट
  • औषधनिर्मिती, कच्चा माल प्रक्रिया, आयटी हार्डवेअर, बांधकामे
  • माॅल, बाजारपेठ सोडून जीवनावश्यक, बिगरजीवनावश्यक वस्तूंची स्वतंत्र दुकाने
  • ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक सेवा पुरवण्यास परवानगी 
  • वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचं कामकाज
  • ३३ टक्के कर्मचारी उपस्थितीनुसार सरकारी, खासगी कार्यालये खुली ठेवण्यास मुभा
  • ग्रामीण भागात सर्व प्रकारचं औद्योगिक आणि उत्पादन कार्य
  • मनरेगाची कामं, फूड प्रोसेसिंग युनिट, विट भट्ट्या 
  • शेती काम, पशुपालन, मत्स्य पालन, कुक्कुटपालन   
  • अंगणवाडी, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, महिलांसंबंधी संस्था

काय बंद?

  • सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब बंद 
  • आंतरजिल्हा प्रवास बंद
  • न्हावी, सलूनही बंद
  • कंटेन्मेंट भागात औषधांची दुकानंही बंद  
  • सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कुणालाही घराबाहेर पडण्यास बंदी
  • गर्भवती महिला, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, १० वर्षांहून लहान मुलांना घराबाहेर पडण्यास बंदी

आॅरेंज झोन :

काय सुरू?

  • टॅक्सी आणि रिक्षा सेवेला (चालक अधिक २ प्रवासी)  
  • स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आंतरजिल्हा प्रवासाला मुभा 
  • चारचाकी गाड्यांत चालक अधिक दोन व्यक्तींना मुभा
  • बाईकवर एकाच व्यक्तीला परवानगी

काय बंद?

  • रेड झोनप्रमाणे इतर सेवा बंद

ग्रीन झोन :

काय सुरू?

  • आंतरजिल्हा प्रवासाला मुभा
  • बस सेवा ५० टक्के क्षमतेने चालवण्यास मुभा 
  • तीनही श्रेणीत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही.
  • वाइन शॉप्स, पानाची दुकानांना मुभा  
  • खरेदी करताना ग्राहकांनी ६ फुटांचं अंतर राखणं आवश्यक
  • एकावेळी शॉपमध्ये ५ हून अधिक लोकं नकोत
  • न्हावी, सलून अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणाऱ्या संस्थांना सूट

काय बंद?

  • सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी बंद  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा