Advertisement

14 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात नाही!


14 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात नाही!
SHARES

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला जाऊन पोहोचले. मात्र मागील 13 दिवसापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरू राहिल्याने सामान्यांना किंचीतच का होईना मात्र दिलासा जरुर मिळाला आहे. पण बुधवारी 14व्या दिवशी मात्र कोणतीही कपात दिसली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. मंगळवारी पेट्रोलच्या दरात 20 पैसे आणि डिझेलच्या दरात 7 पैशांची कपात दिसून आली. 


पेट्रोलचा दर असा

आर्थिक राजधानी मुंबईत सध्या पेट्रोलचा प्रतिलिटर दर 85.04, तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.32 रुपये झाला आहे. मात्र बुधवारी कोणतीही कपात न झाल्याने पेट्रोल-डिझेल मंगळवारच्या दरानुसारच मिळत आहे. 


कच्च्या तेलाचे दर घसरले

अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट होत आहे. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती सुधारत असल्याने त्याचा लाभ इंधनदराला होत आहे. जानेवारीत  आयसीई समभाग व्यवहार 0.04 टक्क्यांनी घसरून 77.63 डॉलर प्रति बॅरल होता, तर डब्ल्यूटीआयचा डिसेंबरचा करार 0.07 टक्क्यांनी वाढून 67.64 डॉलर प्रति बॅरलवर गेला होता.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा