Advertisement

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांवरी उत्पादन शुल्क कमी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
SHARES

मागील २ महिन्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांवरी उत्पादन शुल्क कमी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. शुक्रवार ५ नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच, केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात घट केल्यानंतर अनेक राज्यांनीदेखील पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये घट केली होती.

केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि कर्नाटक सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यासोबत हरियाणामध्येही व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.

या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारनं करात कपात केली नाही, त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणाही साधला.

मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

कोलकातामध्ये डिझेलची किंमत ८९.७९ रुपये आणि पेट्रोल १०४.६७ रुपयांनी विकलं जात आहे. अशातच पंजाब सरकारनंही पेट्रोलच्या किमतींमध्ये १० रुपये प्रति लिटरनं आणि डिझेलच्या किमतींमध्ये ५ रुपये प्रति लिटरनं कपात करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?

देशातील महत्त्वाची शहरं 
पेट्रोल रुपये/लिटर
डिझेल रुपये/लिटर
मुंबई
109.98
94.14
दिल्ली
109.69
98.24
चेन्नई
104.67
89.79
कोलकाता
101.40
91.43
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा