Advertisement

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल- डिझेल महागलं

सततच्या या इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. याआधी बुधवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी महागलं आहे.

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल- डिझेल महागलं
SHARES

तेल कंपन्यांनी गुरूवारी पुन्हा इंधन दरवाढ केली. पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल ९ पैसाने महागलं आहे. मुंबईत आता पेट्रोलचा दर १०६ रुपये ५९ पैसे आणि डिझेलचा भाव ९७ रुपये १८ पैसे झाला आहे. 

सततच्या या इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. याआधी बुधवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी महागलं आहे. गुरूवारच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०० रुपये ५६ पैसे आणि डिझेल ८९ रुपये ६५ पैसे लिटर झाले आहे. चेन्नईत ९४.१५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६५ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४० रुपये झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.

महाराष्ट्रातील परभणीत पेट्रोल १०७ रुपये ६६ पैसे आणि डिझेल ९६ रुपये ७५ पैसे लिटर झाले आहे. पुण्यात पेट्रोल १०६ रुपये १६ पैसे आणि डिझेल ९५ रुपये २८ पैसे लिटर झाले आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा