Advertisement

शेतकऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयात, याचिका दाखल


शेतकऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयात, याचिका दाखल
SHARES

गेल्या पाच दिवसांपासून राज्यभर सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्याचा आव आणते आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मनात मात्र फसवणूक झाल्याची भावना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे आता ऐकणार कोण ? असा प्रश्न उपस्थित झालेला असताना शेतकऱ्यांचा हा प्रश्न आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून उच्च न्यायालयाने देखील ही याचिका दाखल करून घेतली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी ठेवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करणे या आमच्या प्रमुख मागण्या असल्याची माहिती याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी दिली.

सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न पेटलेला असला तरी आम्ही मागील सहा महिन्यांपासून हा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रश्नी आम्ही मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे.

- हेमंत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, भारत अगेन्स्ट करप्शन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा