Advertisement

मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाचा पिलर कोसळला, २ वाहनांचं नुकसान


मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाचा पिलर कोसळला, २ वाहनांचं नुकसान
SHARES

मानखुर्दमध्ये महापालिकेच्या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना लोखंडी पिलर कोसळून २ वाहनांचं नुकसान झालं आहे. ही घटना शनिवारी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत अद्याप तरी कुणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसंच दुर्घटनेप्रकरणी देवनार पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.


नेमकी कुठे घडली घटना?

मानखुर्दच्या शिवाजी नगर परिसरात जोगेश्वरी-मानखुर्द लिंकरोडला जोडण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी एका कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्याने उड्डाणपुलाजवळ उभ्या केलेल्या लोखंडी पोलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे उड्डाणपुलाला आधार देण्यासाठी उभा केलेला लोखंडी पोल तिथं उभ्या करून ठेवलेल्या वाहतूक पोलिसाच्या दुचाकीवर आणि एका कारवर पडला. सुदैवाने त्यावेळी कारमध्ये कुणी नव्हते.




रस्त्यावर वाहतूककोंडी

या घटनेमुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर वाहतूककोंडी झाली आहे. छेडा नगर नाका ते सायन-पनवेल महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने हा पिलर तात्काळ बाजूला काढण्याचं काम हाती घेतलं आहे.

या दुर्घटनेमुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. या दुर्घटनेस कारणीभूत म्हणून मानखुर्द पोलिसांनी कंटेनरचा चालकावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केल्याची माहिती झोन ६ चे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.



हेही वाचा-

मेट्रो-२ ब च्या कामावरील स्थगिती कायम

परवानगीशिवाय एकही झाड कापणार नाही, 'एमएमआरसी'ची न्यायालयात ग्वाही


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा