Advertisement

प्लास्टिक बंदी : ४ दिवसांमध्ये १० लाख ५० हजारांचा दंड वसूल

मंगळवारी संपूर्ण मुंबईत ७९ ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. दरम्यान या सर्वांकडून २५५ किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. मागील ४ दिवसांमध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम साडेदहा लाखांवर पोहोचली आहे.

प्लास्टिक बंदी : ४ दिवसांमध्ये १० लाख ५० हजारांचा दंड वसूल
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सर्व दुकानांची झाडाझडती घेतली जात आहे. मंगळवारी संपूर्ण मुंबईत ७९ ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. दरम्यान या सर्वांकडून २५५ किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. मागील ४ दिवसांमध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम साडेदहा लाखांवर पोहोचली आहे.


२४९ पथकांकडून झाडाझडती

महापालिकेच्या मंड्या, दुकानं, फेरीवाले, मॉल्स आणि शॉपिंग सेंटरमधून महापालिकेनं नियुक्त केलेल्या परवाना, बाजार, दुकान आणि आस्थपना विभागाच्या निरीक्षकांची पथकं फिरत आहेत. या एकूण २४९ पथकांच्या माध्यमातून मुंबईतील सर्व दुकानांसह मॉल्स आणि शॉपिंग सेंटरसह फेरीवाल्यांची झाडाझडती घेतली जात आहे.


३ लाख ९० हजारांचा दंड वसूल

मंगळवारी दिवसभरात मुंबईतल्या विविध भागातील ५ हजार ४४० दुकानं आणि गाळ्यांची पाहणी केली. यामध्ये फक्त ७८ दुकाने, गाळेधारक आणि फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. यासर्व २५५ किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या असल्याची माहिती उपायुक्त विशेष निधी चौधरी यांनी दिली आहे. यासर्वांकडून ३ लाख ९० हजार एवढा दंड वसूल केला आहे. याशिवाय १६ दुकानांचा माहिती अहवाल तयार करण्यात आला आहे.


'इतका' दंड वसूल

मागील चार दिवसांमध्ये एकूण १३ हजार ५०१ दुकानांसह गाळयांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये आतापर्यंत एकूण ९७२ किलोच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण दंडाची रक्क्कम ही दहा लाख ५० हजार एवढा झाला आहे. आतापर्यंत २६ जणांचा माहिती अहवाल तयार करण्यात आला आहे.


हेही वाचा - 

ही प्लास्टिकबंदी की आणीबाणी?

प्लास्टिकला पर्याय काय ? इथं मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा