Advertisement

प्लास्टिकला पर्याय काय ? इथं मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं


प्लास्टिकला पर्याय काय ? इथं मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं
SHARES

महाराष्ट्रात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. पण प्लास्टिकला पर्याय काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण महापालिकेच्या आयोजित शिबिरात मुंबईकरांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. २२ जून ते २४ जून असे तीन दिवस वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 


या शिबिरात प्लास्टिकला पर्याय काय ? यासंदर्भात माहिती देणारे अनेक स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचं उत्पादन करणारे अनेक महिला बचतगट आणि कंपन्या सहभागी झाल्या होत्या. प्लास्टिकला नेमका पर्याय काय ? पिशव्या किंवा इतर प्लास्टिकच्या वस्तूंवर पुनप्रक्रिया कशी केली जाते ? आहे याचा आढावा आपण घेणार आहोत.

१) प्लास्टिक पिशवीला कापडी पिशव्या हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेगवेगळ्या अाकाराच्या कापडी पिशव्या इथं उपलब्ध करून दिल्या होत्या. छोट्या पर्सपासून ते भाजी घेण्यासाठीच्या मोठ्या बॅग्सपर्यंत सर्व काही इथं उपलब्ध होतं.



२) प्लास्टिकची किंवा थर्माकॉलची भांडी, प्लेट्स, वाट्या याला देखील पर्याय उपलब्ध झाला आहे. ऊसाचा वापर करून बनवण्यात आलेली भांडी, प्लेट्स, वाट्या, चमचे हे प्रदर्शनात मांडण्यात आले होते. पापाको ग्रीनवेअर या संस्थेतर्फे या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.



३) हॉटेलमधून पदार्थ आणताना पदार्थ प्लास्टिकच्या डब्यातून मिळतात. या डब्यांना पर्याय नाही, असं ठामपणे सांगितलं जात होतं. पण याला देखील इथं पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कागदी डबे, त्याची घट्ट झाकणं, कागदापासून तयार करण्यात आलेल्या फॉइलचे डबे असे पर्याय प्रदर्शनात होते.



४) प्लास्टिकच्या स्ट्रॉला पर्याय म्हणून स्ट्राँग इंडिया या संस्थेतर्फे केळाच्या पानापासून स्ट्रॉ तयार करण्यात आला अाहे. कागदापेक्षा झाडांची पानं सहज निसर्गामध्ये मिसळून जातात.

५) प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार करण्यात आलेल्या बाकांपासून दरवाज्यांपर्यंतची उत्पादनं देखील प्रदर्शनात मांडण्यात आली होती. प्लास्टिक बेंच, दरवाजे, टेबल याला पर्याय म्हणून टेट्रापॅकपासून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.


६) भाजी घेण्यासाठी अनेकदा प्लास्टिकची पिशवीच वापरली जाते. पण आता याला कापडी पिशवीचा पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कप्प्यांची कापडी पिशवी महिला बचत गटातर्फे उपलब्ध करून दिली होती. यामध्ये भाजी ठेवण्यासाठी कप्पे होते. या पिशव्या आदिवासी भागात बनवण्यात आल्या आहेत.


७) प्लास्टिकचे रॅपर, पिशव्या यांचा वापर पायपुसणे, शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी होतो. याचीही माहिती प्रदर्शनामध्ये  देण्यात आली होती.



८) बायोग्रीन या कंपनीतर्फे बायोग्रीन उत्पादनं मांडण्यात आली होती. प्लास्टिकसारखे दिसणारे पण प्लास्टिक नसणाऱ्या १०० टक्के विघटनशील पिशव्या इथं पाहायला मिळाल्या. यामध्ये कॅरीबॅग, कचऱ्यासाठीच्या पिशव्या यांचा समावेश होता.



९) गणेशोत्सव जवळ येत आहे. त्यामुळे प्रदर्शनात इको फ्रेंडली मखरांचा पर्याय देखील उपलब्ध होता. कार्डबोर्डचे मखर, केळीच्या खांबापासून आणि बांबूंपासून बनवण्यात आलेले मखर हा थर्माकॉलला चांगला पर्याय आहे.

१०) प्लास्टिकच्या बाटल्या क्रश करून त्यापासून टीशर्ट आणि कापडी पिशव्या बनवण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.



हेही वाचा

टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर !




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा