पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह (पीएमसी) बँकेवर घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेचे हजारो खातेदार हवालदील झाले आहेत. मंगळवारी दुपारी २ वाजता बँकेच्या खातेदारांची दिल्लीमध्ये रिझर्व्ह बँकेबरोबर बैठक होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्यानंतर खातेदार पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात शनिवारी मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी जोरदार आंदोलन केलं होतं.
पीएमसी बँक घोटाळ्यामुळे अनेक खातेदार चिंतेत आहेत. अशातच बँकेचे खातेदार संजय गुलाटी आणि फत्तेमल पंजाबी यांच्या ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संजय गुलाटी यांचे पीएमसी बँकेत ९० लाख रुपये जमा होते. घोटाळयानंतर ते मोठ्या दडपणाखाली होते. मुलूंड येथे राहणारे बँकेचे दुसरे खातेदार फत्तेमल पंजाबी यांचा मंगळवारी मृत्यू झाला. बँकेत जाण्यासाठी ते घरातून बाहेर पडत असतानाच त्यांना ह्दयविकाराचा झटका आला.
पीएमसी बँकेचे आणखी एक खातेदार असलेल्या ३९ वर्षीय महिला डाॅक्टरचा नुकताच मृत्यू झाला. त्या काही दिवसांपासून तणावात होत्या. त्यांनी आत्महत्या केली. मात्र, पोलिसांचं म्हणणं आहे की, महिला डाॅक्टरांनी आत्महत्या केली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा -
PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ