Advertisement

गेट वे ऑफ इंडिया : समुद्रात कचरा टाकणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता.

गेट वे ऑफ इंडिया : समुद्रात कचरा टाकणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
SHARES

प्रसिद्ध पर्यटन स्थळ गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्रात कचरा टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाई केली आहे. ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'गेटवे ऑफ इंडिया'वर काही लोकांनी टॅक्सीतून उतरून कचरा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी कारवाई केली. 

कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला आहे. गेट वे ऑफ इंडियावर समुद्रात कचरा टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या संदर्भात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून कचरावेचकांची टॅक्सी क्रमांक MH 01 AT 6720 शोधून काढली. 

टॅक्सी चालक मोहम्मद याकूब अहमद दूधवाला (वय 62) याला कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सदर व्यक्तीला महानगरपालिका कायद्यान्वये 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

कुलाबा पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे गृह विभागाने सांगितले. अशा प्रकारे समुद्रात कचरा टाकणे दंडनीय गुन्हा असल्याने कोणत्याही व्यक्तीने समुद्रात कचरा टाकू नये, असे आवाहनही गृह विभागाने केले आहे.

मुंबई पोलिसांच्या हॅण्डलवर मंगळवारी एक व्हिडिओ पाठविण्यात आला होता. यामध्ये ताज हॉटेलसमोर गेट-वे ऑफ इंडियाच्या बाजूला किनाऱ्यावरून काहीजण समुद्रात कचरा टाकत असल्याचं दिसत आहे.

रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या टॅक्सीत कचऱ्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. चार ते पाच जण एक एक पिशवी घेऊन ती समुद्रात रिकामी करीत असल्याचे दिसत होते.


हेही वाचा

प्रदूषण कमी करण्यासाठी 1 डिसेंबरपासून रस्ते धुतले जाणार

BMC च्या नवीन हॅल्पलाईन नंबरवर कचरा जाळण्याच्या तक्रारींचा पूर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा