Advertisement

दादरमध्ये पोलिसांनी केली वृक्षारोपण सप्ताहाला सुरुवात!


दादरमध्ये पोलिसांनी केली वृक्षारोपण सप्ताहाला सुरुवात!
SHARES

मुंबई शहरात 1 जुलैला वृक्षारोपण सप्ताहाला सुरुवात झाली आहे. 7 जुलैपर्यंत अनेक पक्षाच्या राजकीय मंडळी या वृक्षारोपण सप्ताहात वृक्ष लावून आपले योगदान देणारच आहेत. त्याची सुरुवात मुंबई पोलिसांनी केली आहे.

शिवाजी पार्क पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गंगाधर सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दादरच्या नारळी बागेत चिकू आणि नारळाची झाडे लाऊन या वृक्षारोपणाला पोलिसांनी सुरुवात केली. यावेळी शिवाजी पार्क पोलिसांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवाजी पार्क पोलिसांबरोबरच मुंबई शहरातील सर्वच विभागातील पोलिस या सप्ताहात प्रत्येक विभागामध्ये वृक्षरोपण करणार आहेत.


झाडे वाचवणे, झाडे लावणे, त्याचबरोबर त्यांची वाढ कशी होईल? निगा कशी राखता येईल? याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये वाढलेल्या बांधकामांमुळे वृक्षांची संख्या घटली आहे. त्यामुळे सर्वांनीच वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याची आवश्यकता आहे.


- गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा