Advertisement

बोरीवलीत रेल्वे स्थानकालगतच्या 287 झोपड्यांवर पोलिसांची कारवाई


बोरीवलीत रेल्वे स्थानकालगतच्या 287 झोपड्यांवर पोलिसांची कारवाई
SHARES

रेल्वे स्थानकाच्या परिसरात बांधलेल्या अनधिकृत झोपड्यांवर बोरीवली रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार बोरीवली (प.) आणि दहिसर (प.) च्या दरम्यान स्थानिक भूमाफियांनी रेल्वेच्या जागेत अनधिकृतरित्या अतिक्रमण करत शेकडो झोपड्या बांधून लाखोंची कमाई करत आपला गोरख धंदा सुरू ठेवला होता.

तसेच रेल्वेच्या जागेत अनधिकृतरित्या बांधलेल्या या झोपड्यांना या भू-माफियांनी भाडेतत्वावर देऊन महिन्याला प्रत्येक खोलीमागे दोन ते चार हजार रुपये भाडेकरूंकडून वसूल करत आपली कमाई सुरू ठेवली होती.

बोरीवली रेल्वे पोलीस अधिकारी के. के. मीना यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बोरीवली रेल्वे पोलीस, जीआरपी आणि शहर पोलिसांच्या मदतीने 287 झोपड्यांवर तोडक कारवाई करत बोरीवली रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवले.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सन 2007 च्या नंतर या अनधिकृत झोपड्यांवर पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली. 2007 मध्ये रेल्वे पोलीस या झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली होती. त्यामुळे त्यावेळी या झोपड्यांवर कोणत्याच अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा