शिवसेनेकडून मोफत कचरा डब्बा वाटप

 Marine Drive
शिवसेनेकडून मोफत कचरा डब्बा वाटप
शिवसेनेकडून मोफत कचरा डब्बा वाटप
शिवसेनेकडून मोफत कचरा डब्बा वाटप
शिवसेनेकडून मोफत कचरा डब्बा वाटप
See all

चंदनवाडी - मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेत. कुणी आरोग्य शिबीर तर कुणी ब्लँकेट वाटप करताना पाहायला मिळतंय. गिरगावच्या प्रभाग क्रमांक 222मध्ये परिसरातील कचरा मुक्त व्हावा यासाठी शिवसेनेकडून कचऱ्याच्या डब्ब्याचं वाटप करण्यात आलं. शिवसेना आमदार संपत ठाकूप यांच्या निधीतून हे कचऱ्याचे डब्बे देण्यात आलेत. विशेष म्हणजे एकीकडे कचऱ्याचे डब्बे देण्यात येत आहेत तर दुसरीकडे बेकायदेशीर पार्किंगकडे कानाडोळा केला जातोय. याला जनतेची सेवा म्हणावं की अजून काही असा प्रश्न नागरिकांना पडलाय. गेली साडे चार वर्षे जी कामं करण्यासाठी वाट पाहत बघत राहावं लागत होतं. निवडणुका आल्यावर तेच राजकीय पक्ष आता रोज वेगवेगळे काम करताना दिसत आहेत असं विशाल सकपाळ यांनी सागितलं.

Loading Comments