Advertisement

बँड स्टॅण्डच्या समुद्रात अडकलेल्या जोडप्याची सुटका

बुधवारी सायंकाळी ताज हाॅटेल समोरील समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किमी आत काही जोडपे खडकावर बसले होते. भरती सुरू झाल्यानंतर त्यांना आजूबाजूला पाणी वाढत असल्याचं भान राहिलं नाही. पाणी वाढल्याचं लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि कमांडो यांनी जीव धोक्यात घालून या दोघांना वाचवलं.

बँड स्टॅण्डच्या समुद्रात अडकलेल्या जोडप्याची सुटका
SHARES

समुद्राच्या साक्षीने प्रेमाचा रंग उधळणाऱ्या जोडप्याचे प्राण बुुधवारी दुपारी मुुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले. वांद्रे पश्चिमेकडील बँण्ड स्टॅण्ड समुद्रकिनारी जोडप्यांची नेहमीच गर्दी असते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ताज हाॅटेल समोरील समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किमी आत काही जोडपे खडकावर बसले होते. भरती सुरू झाल्यानंतर त्यांना आजूबाजूला पाणी वाढत असल्याचं भान राहिलं नाही. पाणी वाढल्याचं लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि कमांडो यांनी जीव धोक्यात घालून या दोघांना वाचवलं. आणखी १५ मिनिटे उशीर झाला असता तर त्यांच्या जीवावर बेतलं असतं.


ओहोटी असल्याने गोंधळ

ताज हाॅटेल समोरील समुद्रकिनारी ४ जोडपी आणि ३ तरुण ओहोटी आल्याचं पाहून अर्धा किमी अंतरावरील खडकावर जाऊन विसावले. प्रेमाच्या आणाभाका घेत गळ्यात गळे घालून बसलेल्या या प्रेमीयुगलाना लाटांनी केव्हा येऊन घेरलं याचंही भान नव्हतं. खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा पायांना स्पर्श झाल्यानंतर त्यांना जाग आली. खडकाभोवती पाणी वाढत गेल्याचं लक्षात येताच त्यांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरूवात केली.



बचावात अडथळे

अडकेल्या एका प्रेमी युगलाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितल्यानंतर पोर्ट झोनवरील मुंबई -१५ पोलिस नौका व भीमा ही पोलिस नौका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र फेसाळलेला समुद्र तोपर्यंत चांगलाच खवळला होता. पोलिसांच्या बोटी ही या लांटापुढे स्तब्ध उभ्या राहू शकत नसल्यामुंळे या प्रेमी युगुलांना वाचवण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत होते. युगुल मदतीसाठी आरडाओरड करत असल्याने समुद्र किनारी बघ्यांची गर्दी उसळली.


जीवाची पर्वा न करता समुद्रात

अखेर पोलिस शिपाई अजित शिंदे, समीर भोईर व नंदू शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता खवळलेल्या समुद्रात उडी टाकत ११ जणांचे प्राण वाचवले. पोलिसांनी जिवाची बाजी लावत या प्रेमी युगुलासह काही जणांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर समुद्र किनारी झालेल्या गर्दीने पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक केलं. तर पोर्ट झोन पोलिसांच्या या शौर्याबाबत पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी मुंबई - १५ पोलिस नौका व भीमा पोलिस नौकेवरील पोलिस कर्मचाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा